Skip to main content

Posts

Showing posts from June, 2019

लोकशाहीचा राँग टर्न

(टीप: हा लेख निवडणुका संपल्यावर जवळपास एक आठवड्याने लिहिला होता. याला काही वर्तमानपत्रांत प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले, पण  त्यांच्याकडून योग्य ती  प्रतिक्रिया न मिळाल्याने मी तो संपूर्ण लेख इथेच, माझ्या ब्लॉगवर पब्लिश करत आहे.) समजा, आपण एखाद्या वाहनात बसून चाललो आहोत आणि आपल्या चालकाला आपण सरळ जाण्यास सांगितलं पण अचानक चालकाने भलतीकडेच गाडी वळवली तर आपण त्याला विचारणार, प्रश्न करणार. त्याने जरी उत्तर दिलं की आपण योग्य रस्त्यावर आहोत, किंवा हा रस्ता चांगला आहे, किंवा इथून आपण लवकर पोहोचू, तरी आपल्या मनात संकोच असतोच. पुढे बराच वेळ प्रवास करून आपण आपल्या योग्य ठिकाणी पोहोचलोच नाही आणि तरी चालक गाडी बेधुंदपणे चालवत आहे आणि आपल्याला रस्ता ओळखीचा वाटत नाही, तेव्हा आपण त्याला रागवणार, ओरडणार, भांडणार आणि गाडीतून उतरणार किंवा स्वत:ची गाडी असेल तर त्याला गाडीबाहेर काढून स्वत: योग्य ठिकाणी पोहोचणार. पण आपण असं करत नाही आहोत. आपण चालकाला प्रश्नच विचारत नाहीत. आपल्या वतीने प्रश्न विचारायलासुद्धा कोणी नाही. हेच आज आपल्या देशात आणि राजकारणात होतंय! नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडण