दोन दिवसापूर्वी खूप महिन्यांनी Shailesh भेटला होता. आम्ही दिवसभर म्हणजे जवळपास आठ तास असंख्य विषयांवर चर्चा केली, गप्पा मारल्या. दादरचा एक रस्ता सुटला नाही त्या दिवशी. ठिकठिकाणी "चल निघतो" असं म्हणत तासंतास तिथे उभे राहून बोलत होतो. बऱ्याच दिवसांनी कोणाशी तरी अनेक विषयांवर बोललो. मी रिचार्ज झालो. गप्पा मारताना आजू बाजूला असणाऱ्या गोष्टीचं चित्र नेणीवेत छापत गेलं आणि दोन दिवस सतत त्याची जाणीव होत होती; अनेक गोष्टी समोर येत गेल्या. त्यातूनच काहीतरी सुचलं, ते मांडतोय... _______________________ लोकशाहीच्या देशात राहणारे आम्ही, कळपात राहण्याची सवय गेली नाही, रंगांच्या गर्दीत माथे फोडत बसलो, पण माथ्यावरचं आभाळ दिसलंच नाही... गाडीसारखी व्यवस्था, त्याच्या चाकासारखे आपण, विद्रोह करतो, पण एकाच ठिकाणी गोल फिरत, झिजत, घासत... त्या चाकांना जवळ यायचीसुद्धा सोय नाही... गाडी घेऊन जाईल तिकडे हे चाकांचे जत्थे जाऊ लागले आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाणारं जहाज आपण बुडून बसलोय की काय, काही कळतच नाही... हेच चाक लोकशाहीचा गाडा घेऊन चाललेत, पण गाडीचा चालक मात्र भलत्याच ...