गेल्या निवडणुकांमध्ये भारतीयांनी मोदीला मत दिल्यामुळे आज त्यांची मनमानी आपल्याला दिसत आहे. भारतीय संविधानानुसार स्थापन केलेलं "नियोजन आयोग" (planning commission) मोदींनी त्याला सरळ बरखास्त केलं. जगातल्या इतर देशांमध्ये धर्मनिरपेक्ष भारताचा पंतप्रधान गेल्यावर तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना "गीता" वाटत फिरतात. जगभरातून होणाऱ्या त्यांच्या विरोधातल्या बातम्या टी.व्ही.वर येत नाही, तर उलट "संघाचे" भाषणं प्रसारित करण्यात येऊ लागले आहेत. ते अमेरिकेत भाषण करताना भारत देशाला उन्नत करणाऱ्या महामानवांना मोदी विसरतात. मोदींनी आजपर्यंत फक्त गुजरातच्या खोट्या प्रगतीच्या गप्पा केल्या, पण त्यांचंच सरकार असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश यांच्यासारख्या इतर राज्यांचे काय झाले हे ते सांगत नाहीयेत. मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मोदी रिझव्र्ह बँक दिल्लीला हलवत आहेत, त्याची तयारी म्हणजे रिझव्र्ह बँके तीन कार्यालये मोदींनी आधीच दिल्लीला हलवले आहेत. त्या आधी पालघर येथे प्रस्तावित असलेले महाराष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे कार्यालयही मोदी यांनी गुजरातमध्ये हलवले आहे. मुंबईवर झालेल...