संस्कृती हा विषय म्हटलं तर खूप गुंतागुंतीचा आहे. आपण याला खूप सोप्या पद्ध्तानीने समजून घेऊ शकतो, पण जर हा विषय कठीण समजून राहिलं तर मग तो कळायलाही खूप कठीण आहे. खरं तर संस्कृती ही कलेमधून अधिक लवकर व सोप्या पद्धतीने रुजली जाते. त्याही अगोदर संस्कृतीला धर्माच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजवलं गेलं. आजही अनेक कला किंवा लोककला ह्या हिंदू संस्कृतीच्या मानल्या जातात आणि बऱ्याच आहेतही. पण लोक भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही एकच मानतात. त्यातल्या त्यात गम्मत अशी आहे, की हेच लोक जेव्हा भारतीय संस्कृती इतरांना (परदेशी लोकांना, ई) दाखवत असतात तेव्हा ते हिंदू परंपरा, मंदिर, कला यांसोबत बौद्ध लेण्या, ताज महाल, लाल किला, इत्यादी हेही दाखवतात. जर का तुमच्या म्हणण्यानुसार हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती आहे, तर मग इतर धर्माला का मध्ये आणतात? हे मध्ये आणतात कारण, मुळातच आर्यांनी आणि ब्राह्मणांनी त्यांची संस्कृती ही भारतातील मूळ बहुजनांवर भेसळ करून लादली. म्हणून आपल्याला कळतच नाही की, आपली संस्कृती कोणती आणि परकी कोणती! मुळतः भारतीय संस्कृती ही चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर...